निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा : शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन

2

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा : शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन



नितेश केराम
राजुरा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रiवण बाळ योजनेच्या माद्यमातून आधारभूत आर्थिक मदतीस पात्र आहेत परंतु मागील काही महिन्यापासून या योजनेच्या हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांना गँभीर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे वेळेवर सादर केले नसूनही जमा अद्याप हप्त्याच्या रकमा खात्यावर जमा झालेले नाहीत ही अंत्यँत खेदजनक व अन्यायकारक बाब आहे तेव्हा आपण विशेष लक्ष देऊन वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी राजुराचे तहसीलदार द्रा ओमप्रकाश गौड यांच्याकडे निवेदनाद्रारे केली आहे अन्यथा संबंधित लाभार्थाना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे यावेळी ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इशार्ड शेख अंकुश परेकर अंकुश मस्की यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here