राजुरा नितेश केराम राजुरा तालुक्यातील हरदोना बु गावात भावाने भावाचा गळा दाबून हत्या कल्याची घटना दि 28 जून रोजी रात्री नऊ वाजता घडली प्रदीप मनोहर चीरमुले राहणार हरदोना ( बु ) असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी राजुरा पोलिसांनी वडील मनोहर चिरमुले 50 व भाऊ प्रफुल मनोहर चिरमुले 30 यांना अटक केले आहे प्राप्त माहितीनुसार हरदोना ( बु ) येथे राहणारे मनोहर चिरमुले यांना तीन मुले आहेत 28 जून रोजी रात्री नऊ वाजता च्या दरम्यान मृतक प्रदीप हा आपल्या पत्नी सोबत भाषण करून तिला मारहाण करीत होता त्याचा मोठा भाऊ प्रफुल चिरमुले हा त्याच्या भांडण सोडविण्यासाठी मध्येस्थी करायला गेला असता प्रदीप चिरमुले यांनी त्याला काठीने हातावर मारले त्यामुळे त्याचे वडील मनोहर चिरमुले हें मध्येस्थी करीता गेले प्रदीप चिरमुले हा त्या दोघांनाही ऐकत नसल्याने प्रफुल चिरमुले यांनी त्याला खाली पाडून हाताने गळा दाबून ठेवला व त्याचे वडील मनोहर चिरमुले हें घरातील दोरी आणून त्याचे हात बांधत असतांना प्रफुल चिरमुले यांनी प्रदीपचा गळा दाबून ठेवल्याने प्रदीप हा अचानक बेशुद्ध पडला त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येते नेले असता द्राक्टरांनी त्याला मृत घोषित केले वडील आणि भावाने दोघांनी संगनमत करू प्रदीप चिरमुले यांचा गळा दाबून खून केल्याने राजुरा पोलीस स्टेशनं येथे अपराध क्र 305/2025कलम 103 (1) 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला असून घोघांना अटक केली आहे पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशनं पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे पोलीस उपनिरीक्षक भीमराज सोरते पांडुरंग हाके पोलीस हवलदार किशोर तुमराम शफीक शेख महेश बालगोडवार शरद राठोड आनंद मोरे राजुरा पोलीस स्टेशनं चे स्थानिक गुणे शोध पथक करीत आहे