प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची
वणी तालुका कार्यकारिणी जाहिर
वणी : शासकीय विश्रामगृह येथे रोजी वंदनीय श्री बच्चुभाऊ कडु यांच्या सेवा, त्याग, व समर्पण विचारधारेला प्रेरीत होवुन हजारो च्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये प्रवेश केला यवतमाळ जिल्हा प्रमुख बिपीनभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वमध्ये युवक जिल्हाप्रमुख आशीष तुपटकर,उपजिल्हाप्रमुख मुबीन शेख यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय बैठक घेतली त्याचबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत पक्षाच्या वतीने पद नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. वणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मुबिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला असून वणी, मारेगाव, झरीजामनी तालुक्यातील अनेक मंडळींना निस्वार्थ पणे निर्भिडपणे एकजूट होऊन पक्ष वाढ होण्यासह समाजातील दिव्यांग व्यक्ती, शेतकरी मजूर कामगार तसेच इतरही क्षेत्रात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून विकास कामे कायदेशीर नागरिकांना फायदेशीर व्हावे.समाजात जगताना समान हक्क कायद्याचे पुरेपूर पालन व्हावे कुणावरही अन्याय अत्याचार होता कामा नये यासाठी व पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी क्षेत्रातील पक्ष कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली . त्यावेळी उपस्थित अनिकेत चामाटे वणी प्रहार तालुकाप्रमुख, रघुवीर कारेकर शेतकरी संघटना तालुका प्रमुख, सहकार आघाडी वणी तालुकाप्रमुख तुळशीराम ठाकरे, प्रहार जनशक्ती पक्ष वाहतूक आघाडी तालुकाप्रमुख धनराज भलमे, शहरप्रमुख प्रहार वाहन चालक संघटना सचिन राखुंडे, तालुका सचिव मुन्ना येरेकर
