चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात ,जबरी चोर, धोकादायक व्यक्ती संगम संभाजी सागोरे यास अटक 

74
चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात ,जबरी चोर, धोकादायक व्यक्ती संगम संभाजी सागोरे यास अटक 
एमपीडीए कायदा अंतर्गत पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचा दणका

चंद्रपुर :  जिल्हा चंद्रपूर पोलीस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, जबरी चोर दुखापत करणारा व्यक्ती नामे संगम संभाजी सागोरे वय ३० वर्ष रा. मित्र नगर आंबेडकर कॉलेज जवळ, चंद्रपूर यांचेवर पो. स्टे. बल्लारशा, रामनगर, पडोली, भद्रावती येथे जबरी चोरी, अग्निशस्त्र, जाळपोळ व अश्लिल शब्दात शिवीगाळ, खुन, खुनाचा प्रयत्न करणे असे एकुण २१ गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे. त्याने सामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली असुन त्याने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायदयाला जुमानत नसल्याने याची दखल मा. पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर यांनी घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीयो पारेट्स) वाळु तरकर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन १९८१ (सुधारणा २००९, २०१५) अन्वये प्रस्ताव तयार करून मा. श्री. विनय गौडा जि. सि. भा.प्र.से., जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम नामे संगम संभाजी सागोरे वय ३० वर्ष रा. मित्र नगर आंबेडकर कॉलेज जवळ, चंद्रपूर यास नगुद कायदयांतर्गत १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत दिनांक ३०/०६/२०२५ रोजी आदेश पारीत केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गदर्शनात सुधाकर यादव, उविपोअधि, चंद्रपूर, नयोमी साटम सहायक पोलीस अधीक्षक तथा उविपोअधि, वरोरा, अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा. चंद्रपूर तसेच ठाणेदार पो. स्टे. रामनगर, आसीफराजा शेख, पो. उपनि. उपरे, पो. कॉ. अनिल जमकातन, स्थागुशा चंद्रपूर, पथकातील सपोनि योगेश खरसान, स. फौ. अरून खारकर, पोहवा सुधिर मत्ते, पोहवा परीवरीश शेख यांनी मोलाची कारवाई केली आहे.

सदरची बातमी आपले सुप्रसिध्द दैनिक पत्रामध्ये प्रकाशित करण्यात यावी ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here