वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त गडचांदूरमध्ये वृक्षा रोपणाचा उपक्रम
नितेश केराम गडचांदूर दि 3 जुलै सदुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान गडचांदूर यांच्या वतीने हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्रातील सुप्रसिध शेतकरी नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जयंती निमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त बंजारा समाज बांधव मोट्या संखेने सहभागी होते वसंतराव नाईक यांनी हरीत क्रांती सम्पन्न शेती या विचारांचा प्रसार करून महाराष्ट्राला दुग्धसंम्पन व कृषीसमृद्र करण्याचे महान कार्य केले त्यांच्या विचारांची अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली याची आठवण उपस्थितांनी भावुतेने वेक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त मुख्यद्यापक एम बी चव्हाण सर यांनी भषवले तर प्रमुख अतिथी म्हणून नामदेव जाधव व विनोद चव्हाण सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सं चालन संस्थेचे सदस्य दिपीलकुमार राठोड सर यांनी केले या दिवशीच संस्थेचे कोषाध्यक्ष कनिरामजी पवार सर यांचा वाढदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने उपस्थित बांधवांना अल्पपोहार व चहा देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण उपाध्यक्ष रामचंद्र पवार सचिव उत्तम जाधव सहसचिव अशोक जाधव कोषाध्यक्ष कनिरामजी पवार तसेच उल्हास पवार शंकर राठोड सर दिलीप राठोड सर श्री शिवाजी राठोड सर आदींनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी शंकर राठोड सर यांनी आपल्या वतीने वृक्षदान करून पर्यावरण संदेश दिला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून समाजामध्ये हरीत जाणीव निर्माण करणारा उपक्रम म्हणून अनेकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे