नितेश कराम भद्रावती येतील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भद्रावती मोहरम बहुउद्देशीय उत्सव समिती (सर्वधर्म समभाव ) तर्फे विविध कार्यक्रम दि 06 जुलै 2025 ला सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत गांधी चौक भद्रावती येते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गांधी चौक परिसर येते सम्पूर्ण चॊकात लायटिंग विधुत रोशनाई पताका स्वागत गेट ढोल तासे इत्यादिनी सजावट करण्यात येते यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात अनेक सामाजिक संघटने मार्फत शरबत लंगर मिठाई प्रसाद पिण्याच्या पाण्याचे वितरण होत असते या मध्ये व्यापारी असोसिएशन व सामाजिक संघटना सहभाग राहत असतो भद्रावती तालुक्यातून शहरातून व प्रत्येक वार्डा वार्डातून सवऱ्या खाज्या ताजे पंजे दोले गांधी चॊकात एकत्र येऊन भेटी गाठी घेतात व याला जत्रेचे स्वरूप येत असते गेल्या 20 वर्षापासून सदभावना भाईचारा कैमी ऐकता देशभक्ती शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम समिती मार्फत होत असते मोहरमची 1ली मोहरमची सुरवात होते व मोहरमच्या 4 थी ला व मोहरमच्या 5 वी ला सवाऱ्याची स्थापना होत असते व मोहरमच्या 7 वी ला व मोहरमच्या 9 वी ला रात्रौ सवाऱ्या व खाज्या हें प्रत्येक दरग्यावर भेटी साठी घेत असतात मोहरमच्या 10 वी ला मोहरमची सांगता गांधी चौक येते होतात या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन उमेश रामटेके माजी नगरसेवक व समितीचे अध्यक्ष राजू गैनवार माजी नगर सेवक व समितीचे सचिव अनिल धानोरकर माजी माजी नगराध्यक्ष निलेश पाटील माजी नगरसेवक व कार्याध्यक्ष प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष जावेद शेख सागर जट्टलवार प्रशांत बदखल जेगन दणव एड सुनील नामोजवार माजी नगराध्य क्ष दिलीप ठेंगे दिलीप मांढरे विनायक येसेकर खेमचंद ह्रियानी विलास गुंडावार बाळू उपलंचीवार संजय ब्यानर्जी प्रकाश उपलंचीवार संजय प्रकाश पिपंळकर इत्यादीनी केले आहे