शिक्षण महर्षीच्या! जनता शाळेची बिकट परिस्थिती विद्यार्थ्यांना शाळेत बसने ही अशक्य?
शिक्षणाधिकारी चीर निद्रावस्थेत! महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षानी केला भंडा फोड!
घुग्घूस : देशात सध्या सरकारी शाळेची व सरकार मान्य शाळेची परिस्थिती अंत्यन्त वाईट आहे. बहुसंख्य गोरगरीब नागरिकांचे मुलं हे सरकारी शाळेत शिक्षण घेतात आणि विरोधाभास असा विलक्षण आहे की सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणारे व लाखो रुपयांचा शासकीय वेतन घेणाऱ्या मास्तरांचे मुलं दहा हजार रुपयात नोकरी करणाऱ्या खाजगी इंग्रजी शाळेत शिकतात शिक्षणाचा दर्जा व शाळेची स्तिथी ही जर्जर झालेली आहे. शाळेच्या दुर्दैवी व दुर्लक्षणीय परिस्थितीचा धक्कादायक प्रकार औद्योगिक नगरी घुग्घूस येथून समोर आलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी म्हणून नावारूपास आलेल्या जिवतोडे कुटुंबियांच्या जनता विद्यालय शाळेची बिकट अवस्था महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद यांनी चवऱ्याट्यावर आणली आहे.
शहरातील सर्वात जुनी असलेल्या जनता विद्यालयाची परिस्थिती अंत्यन्त बिकट असल्यामुळे शाळेतील मुलांच्या पालकांनी सदर बाबीची तक्रार यास्मिन सैय्यद यांच्याकडे केली असता त्यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता या शाळेत विद्यार्थ्यांना प्रारंभीक मूलभूत सुविधा ही दिल्या जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शाळेच्या इमारत ही मोलकळीस आली असून भिंतीला जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. छतावरील तीन फाटले असून यामधून संपूर्ण वर्गात पावसाचा पानी पडतो सध्या पावसाळा सुरू विदयार्थ्यांनी पावसात भिजून शिक्षण कसे घ्यायचे?
घुग्घूस शहर हा प्रचंड उष्ण शहर असतांना शाळेतील पंखे हे पूर्णतः तुटलेले आहेत या शहरात पंखे व कूलर शिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही अश्या जीवघेण्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत शिकावे लागत आहे. शाळेच्या खिडक्या पूर्णतः तुटलेल्या आहेत ही इमारत कधी कोसळून विद्यार्थ्यांचा जीव जाईल नेम नाही. रस्त्यावर लघवी करायची नाही हे संस्कार शाळेत शिकविले जातात या शाळेत मुलाकरीता शौचालय व मुत्रीघरच नाही. मुलीसाठी असलेल्या मुत्रीघराची अवस्था इतकी भीषण व घाणेरडी आहे की या मुत्रीघराचा वापर केल्यास विद्यार्थीनीना जीवघेणे आजार होण्याची शंभर टक्के शक्यता आहे.
इतकी भयंकर स्तिथी असतांना या विभागातील शिक्षण अधिकारी झोपेत असतात की चिरी – मिरी घेऊन गप्प गुमान बसले आहेत असा संतप्त प्रश्न सैय्यद यांनी केलेला आहे. शाळेतील ही दुरावस्था शक्य तितक्या लवकर दुर न केल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन या शाळे व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा सैय्यद यांनी दिला आहे.