नितेश केराम राज्य शासनाच्या एक्सiईज ड्युटी धोरणा विरोधात इतर ठीकानांसह जिवती कोरपना तालुक्यातील बिअर बार & रेस्टॉरंट चालक मालक यांनी 14 सोमवार रोजी मूक स्वरूपात मोर्चा काढून कोरपना तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवला आहे या दिवशी शहरातील सर्व बिअर बार & रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते संघटनेने आरोप केला की अचानक 10 टक्के वाढलेला व्यट 15 टक्के वाढलेली नूतनीकरण फी आणि तबलं 60 टक्के पर्यंत गेलेली एक्सiईज ड्युटी यामुळे मद्येविक्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे हा निर्णय व्यवसाय उध्वस्त करणारा असल्याचा ठपका ठेवत एकीकडे या धोरणामुळे सम्पूर्ण उद्योग संकटात सापडला असून अनेक व्यवसायिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत तर दुसरीकडे याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता बळावली असून रोजगाराची समस्या उभी ठाकली आहे यापुढेही शासनाने तो निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आयुक्त ( MR) राज्य उत्पादन शुक्ल विभाग मुंबई यांनाही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे