जिवती तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना नवसंजीवनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून मार्ग मोकळा
आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नाला मोठे यश
नितेश केराम
जिवती : विधानसभा क्षेत्रातील दुर्गम आणि आकांक्षित जिवती तालुक्यातील प्रलंबित वनजमीन पट्याच्या प्रश्नांना नवसंजीवनी मिळाली आहे 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील विधान भवन येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या समस्यावर सविस्तर चर्चा झाली आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा मुद्धेसूद पाठपुरावा करत मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आमदार भोंगळे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या निद्रेशांमुळे जिवती तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकालीन समस्याचा निकाली निघनार आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाच्या वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिवती तालुक्यातील समस्या तीन महिन्यात जलदगतीने निकली काढण्याचे निर्देश दिले विशेषत : वनक्षेत्र घोषीत केलेल्या 8’6’59’8 हेक्टर जमिनीच्या सुधारनेसाठी तातडीने कारवाई करून आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले यामध्ये 1980 पूर्वीच्या 6’260 हेक्टर आणि 1980 ते 1996 दरम्यान 2’650 हेक्टर जमिनीचे प्रस्ताव दोन टप्यात तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले वनसंवर्धन काद्यातर्गत केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या जमिनीचे निर्वणीकरण तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील अनेक समस्याचा पाढा वाचला 1950 55 च्या काळात मराठवाड्यातून स्थलांतरीत होऊन जिवतीत स्थानिक झालेल्या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांनविना जिवन जगावे लागत आहे त्यांच्या तीन पिढ्या निघून गेल्या तरी जमिनीच्या मालकी हकाचा प्रश्न कायम आहे याशिवाय जिवती कोदेपूर आणि गुडसेला येतील सिंचनासाठी सुरु असलेली तलावांची कामे बंद पडली आहे जिवती नगरपंच्यायतीतील घरकुलाचा आणि वादग्रस्त 14 गावांचा मुद्धाही प्रलंबित आहे या सर्व समस्यावर मुख्यमंत्र्यानी संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि सम्पूर्ण समस्यावर तीन महिन्यात उपयोजना करण्याचे निर्देश दिले या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक मंत्री अशोक उईके आमदार देवराव भोंगळे अपर मुख्य सचिव मिलिंद मेस्कर यांच्या सह आधी मान्यवर उवस्थित होते