जन सुरक्षा विधेयकाचा विरोध व प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा वणी येथे पुरोगामी संघटना व पक्षांचे निदर्शने आंदोलन संपन्न
____________________________
वणी :- संघटना बांधण्याचा व आंदोलन करण्याचा अधिकारावर गंडांतर आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाचे विरोधात वनी येथे लोकशाहीवादी संघटनांनी व पक्षाने जन सुरक्षा कायद्याची होळी करून जन सुरक्षा विधेयकाचा विरोधात निदर्शने करून उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
काल दिनांक 15 जुलै रोजी वनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यासमोर लोकशाहीवादी संघटना व पक्षांनी एकत्र येत जनतेचा अधिकारावर गदा आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाचा विरोधात तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधात निदर्शने करण्यात येऊन जन सुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली.
यावेळेस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजय धोबे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अनिल हेपट, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, पत्रकार बाळासाहेब खैरे यांनी यावेळेस आपले मत मांडले. या निषेध आंदोलनाचे संचालन दत्ता डोहे यांनी केले.
या निदर्शने आणि निषेध कार्यक्रमाला प्रामुख्याने किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, वणी वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे, प्रवीण खानझोडे, गुरुदेव संघटनेचे दिलीप भोयर, भाकप चे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे, विनोद बोबडे, विलास शेरकी, भाऊसाहेब आसुटकार, शंकर पुणवटकर, संजय तेलंग, दिलीप वागदरकर, नितीन मोवाडे, कृष्णदेव विधाते, पंढरी मोहितकर, पांडुरंग किन्हेकर, जानू अजानी, अजय कवरासे, राहुल खारकर, मारुती मोडक , मंगेश खामणकर, विनोद बोबडे, विलास शेरकी, संजय गोडे, आशिष रिंगोले आदी उपस्थित होते.