घुग्घूस ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा!
सहाय्यक निबंधकांना काँग्रेसची निवेदनातून मागणी
घुग्घूस : शहरातील आधारस्थंभ पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराची शाई अजून वाळलेली नसतांना शहरातीलच घुग्घूस ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित यांच्या भोंगळ कारभाराची तातळीने चौकशी करून कारवाई अशी मागणी करीत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्ठमंडळाने साहाय्यक निबंधक यांची भेट घेऊन संस्थेची चौकशी करून कारवाईची मागणी केली.
शहरातील आदिवासी समाजाचे रामदास सलामे यांनी 10/10/2011 रोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे कडून 50,000 रुपयांचे कर्ज मागितले असता संस्थेने त्यांना 44,400 रुपयांचा धनादेश दिला व त्यापूर्वी त्यांच्या कडून 2500 रुपये ही घेतले व त्यांना दोन वर्ष प्रतिमाह 1800 भरण्यासाठी सांगितले असता याकुटुंबियाणे नियमितपणे पैश्याचा भरणा केला पतसंस्थेने त्यांना पैसे भरल्या नंतर काही पावत्या दिल्याच नाही.
या 44,400 रुपयांचे कर्जाचे पतसंस्थेने थकबाकी लाखो रुपयात काढली व घर जप्तीचा आदेश काढला या जप्ती कारवाईने घाबरलेल्या सलामे कुटुंबियांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्याकडे मदतीची धाव घेतली असता काँग्रेस पदाधिकारी संस्थे जाऊन संस्था अध्यक्षाना भेटण्याचा प्रयत्न केला असता आता मी जप्ती कारवाईत असून मला भेटता येणार नाही असे सांगितले पीडित कुटुंबियांनी घेतलेल्या कर्जाचे लिखीत स्वरूपात व्याज दरासह संपूर्ण माहिती मागितली असता संस्थेने अर्ज घेण्यास व माहिती देण्यासाठी नकार दिला असता काँग्रेस पक्षाने पीडित कुटुंबियांना घेऊन सहाय्यक निबंधक कार्यलय गाठुन लिखित तक्रार दिली.
या तक्रारीत सलामे यांनी केलेल्या खालील आरोपाचे चौकशी करून कारवाई करण्याची काँग्रेसने नागणी केली आहेत.
संस्थेचा अध्यक्ष सभासदांना माहिती न देता गुपचूपपणे कागदोपत्री निवडणूक घेऊन वन मॅन शो नुसार संस्था चालवीत आहे. सदर पतसंस्थेत आमसभा घेत नाही भागधारकांना आमसभेची अहवाल दिला जात नसल्याने संस्थेची प्रगती बाबत भागधारकांना माहिती मिळत नाही. संस्थेचा सरकारी ऑडीट झालेला नाही संस्थेचा तीन वर्षाचा सरकारी ऑडीट करण्यात यावा. संस्थेचा वार्षिक अहवाल छपाई करून भागधारकांना देने जरुरी आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही भागधारकांना वार्षिक अहवाल देण्यात आलेला नाही. मात्र वार्षिक अहवालचे बिल जोडण्यात येते जे सभासद थकीत कर्जदार आहेत त्यांच्या कर्जावर गैरकायदेशीरपणे व्याज चढवून पुन्हा पुन्हा व्याज आकारणी करून सभासदांना मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. याप्रकारचे भोंगळ कारभार पतसंस्थेत चालत असल्यामुळे यावर तातळीने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात अली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर, रामदास सलामे, शारदा सलामे या उपस्थित होत्या.