वन्यप्रान्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या शंतनू धोटे
युवक काँग्रेसचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन
नितेश केराम राजुरा तालुका हा वनक्षेत्राने वेढलेला तालूका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोट्या प्रमाणात आहे सध्या तालुक्यामध्ये शेतीमध्ये वन्यप्राणी धुडगूस घालून उभ्या शेतपिकांची नासधुस मोट्या प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी आपल्या शेतपिक नुकसान भरपाईसाठी आपल्या विभागाला अर्ज सुद्धा करीत आहेत व आपल्या विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे सुद्धा केले आहे परंतु या भागातील शेतकरी लोकांना अजून पर्यंत नुकसान भरपाईची रकम मिळालेली नाही त्यामुळे राजुरा तालुक्यातील वनप्रान्यांच्या नासधुसीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईच्या देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांच्या कडे आहे यासदर्भात जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्शन खाली राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इशार्द शेख यांच्या नेतृवात राजुरा युवक काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने राजूराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगले यांची प्रत्येक्ष भेट घेऊन निवेदनाद्ररे वरील मागणी करण्यात आली आहे यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इशार्द शेख ओबीसी काँग्रेसचे धनराज चिंचोलकर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे सरपंच अमित टेकाम दिपीप राऊत मनोज मडावी या सह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते