घुग्घुस हद्दीत गावठी बनावटीचे देशी कट्टा आणि जिवंत काडतुस सोबत दोन आरोपी अटक
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई
चंद्रपुर दिनांक २६/०७/२०२५ रोजी स्थानिकों गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेलया खात्रीशिर माहिती वरुन पोस्टे घुग्घुस हद्दीत शास्त्रीनगर परिसरात संशयीतच्या घरात पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे सोनुलाल उर्फ नन्नु कैथल वय २८ वर्ष रा. शास्त्रीनगर वार्ड क्र. ५ घुग्घुस याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे देशी कटटा आणि एक नग जिवंत काडतुस असा एकुण २५५००/-रुपयाचा माल अवैधरित्या मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने सदर अग्निशस्त्र व काडतुस त्याचा मित्र नामे मासिन निसार शेख वय २८ वर्ष रा. हगांधीनगर वार्ड घुग्घुस याचे कडुन खरेदी केल्याचे सांगितल्याने त्यास सुध्दा ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीविरुध्द कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदान्वये अप.क्र. १३७/२०२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअ, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.