रयतवारी परिसरातुन २० gm MD (मेफोड्रॉन) पावडरसह १,९२,०००/- रू चा माल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कारवाई
चंद्रपुर : दिनांक २७/०७/२०२५ रोजी पोउपनि विनोद भुरले, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस पथक सोबत मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करणे कामी रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर आरोपी नामें १) विशाल रत्नाकर भोयर, वय-२१ वर्ष, जात-कुणबी, धंदा-मजुरी, रा. रेहान किराणा स्टोअर जवळ, बगडखिडकी, चंद्रपुर, २) मो. फैज अब्दुल राशीद कुरेखी, वय-२२ वर्ष, रा. नुरी चौक, बगडखिडकी, चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन यांचेकडुन २० ग्रॅम एम. डी. (मेफोड्रॉन) पावडर सह मोपेड गाडी असा एकुण १,९२,०००/- रु. माल जप्त करून आरोपीतांना विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे एन.डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करीता ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले,, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटें, पोशि/हिरालाल गुप्ता, पोशि/अजित शेंड, चपोशि/रिक्षब बारसिंगे, चपोशि/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.