घुग्घूस : हा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असून शहरात सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रच सुरू आहेत. महिलांना गरोदरपणात प्रसूतीच्या प्रसंगी सिजर ऑपरेशन करीता जीवघेण्या कळा सोसत चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 27 किलोमीटरचा अंतर पार करीत जावे लागते सामान्यापेक्षा मोठा असलेल्या कुठल्याही आजारा करीता शहरातील नागरिकांना चंद्रपूरच जावे लागते यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागतो.
घुग्घूस शहरात ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत निर्माण झालेली आहे मात्र प्रशासनाला तिचा लोकार्पण करण्यासाठी वेळच मिळत नाही. ग्रामीण रुग्णालय तातळीने सुरु करावा या मागणी करीता काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी शासकीय दवाखान्या परिसरातील लॉयड्स मेटल्स गेटच्या शेजारील जागेवर ” आत्मक्लेश” आंदोलन करण्यात येत असून सदर आंदोलनात जास्तीत – जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर काँग्रेस महिला काँग्रेस व काँग्रेसच्या सर्व फ्रँटल ऑरगनायझेशनच्या वतीने करण्यात आले.