गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जमालुद्धीन शेख जिवती नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी

17

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जमालुद्धीन शेख जिवती नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी



नितेश केराम
नगरपंचायतीच्या बहुप्रतिक्षित उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायतीच्या सभागृहात आज पार पडली
मागील काही दिवसांपूर्वी जिवती नगरपंचायतीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने नगरपंचातीमधील आघाडीची सत्ता ही अल्प मतात होतील पूर्वी पासूनच नगरपंचायतीची निवडणू क युतीत लढलेल्या भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नगरसेवकांनी त्कालीन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव पारित करून युतीची सत्ता स्थापन केली
भाजपच्या अनुसया राठोड यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आज उपनगराध्यक्ष पदी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जमालुधीन शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे जमालुधीन शेख जिवतीतील मोठ प्रस्थ असलेले गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा गो ग पा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे निकटवर्तीय समजलेले जातात स्व गोदरु पाटील जुमनाके यांनी काँग्रेस ची साथ सोडत गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला तेव्हा जमालुउद्धी शेख यांनी स्व जुमनाके यांना साथ देत गो ग पा मध्ये प्रवेश केला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here