अपघाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्त करा
काँग्रेसची पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी
घुग्घूस : शहरात राजीव रतन चौकात रेल्वे उड्डाणपुलाचा काम सुरू असून याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेले आहे.
दिनांक 30 जुलै रोजी 09 : 45 वाजता लॉयड्स कंपनीत जाणाऱ्या ट्रकने वेकोली कामगारांच्या दुचाकीला जबर धडक दिली याअपघातात दोन वेकोली कर्मचाऱ्यांचे पाय शरीरा वेगळे झाले यानंतर शहरातील नागरिकांचा जीव जाता कामा नये याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल नियमितपणे सुरू करून याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. ही नियुक्ती नागरिकांच्या सुरक्षितते करीता व्हावी नागरिकांना त्रास देण्यासाठी नसावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, कपिल गोगला, कुमार रुद्रारप, निखिल पुनघंटी, सचिन नागपुरे, रामस्वरूप बिमल, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.