जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी सात दिवसाची मुदत वाढ द्या सुदाम राठोड

6

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी सात दिवसाची मुदत वाढ द्या सुदाम राठोड



नितेश केराम
जिवती तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरामध्ये लपलेला अति दुर्गम तालुका आहे या तालुक्यामध्ये मोट्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आहे हा तालुका 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्यापासून वंचीत आहे कारण जिवती तालुकाच ऑनलाईन झालेला नाही तरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबाऱ्याची अट लादली आहे तरी ही अट रद्द करून ऑफलाईन सात बारा वरून फार्मर आयडी काढून मिळावी व या ऑफलाईन सात बारा वरून पीक विमा भरण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी व सात आगस्ट पर्यंत पीक विमा करण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिवती तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी कृषी अधिकारी जिवती यांना निवेदनातून केली आहे निवेदन देताना बळीराम मस्के विशाल राठोड आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here