मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व आदिवासी अधिकार मंच चा वतीने पाटणबोरी येथे जनआक्रोश रॅली व मेळावा
औचित्य ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन
________________________
पाटणबोरी :
९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केल्या जातो तसेच ह्याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहासात महत्त्वपूर्ण घटना घडल्यामुळे क्रांतिदिन म्हणूनही साजरा केल्या जातो. याच महत्त्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार मंच चा संयुक्त विद्यमाने पाटणबोरी येथे जन आक्रोश रॅली व मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

ह्या जन आक्रोश रॅली व मेळाव्याचे अध्यक्षस्थानी कॉ. चंद्रशेखर सिडाम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके , कॉ. ॲड. डी. बी. नाईक हे उपस्थित राहणार आहेत. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. उषा मुरखे, कॉ. मनीष इसाळकर, कॉ.अनिता खुनकर, कॉ. सदाशिव आत्राम, कॉ. मनोज काळे, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. प्रीती करमरकर, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. रामभाऊ जिद्देवार राहतील.
या मेळाव्यात जन सुरक्षा कायदा, शेतकरी कर्जमुक्ती, आदिवासी महिला अत्याचार, आदिवासी खावटी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, एकात्मिक प्रकल्प योजना, निराधार योजना, सरकारी नोकरी अनुशेष, शिक्षणाचे, उद्योगांचे खाजगीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
९ अगस्त २०२५ ला जन आक्रोश रॅली सकाळी ११ वाजता पाटणबोरी येथील राम मंदिर येथून कालिका मंदिर सभागृहापर्यंत काढण्यात येणार आहे.त्यानंतर कालिका मंदिर सभागृह येथे मेळावा होणार आहे.
या भव्य रॅली व मेळाव्याला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन पुंडलिक ढुमणे, श्रीकांत तांबेकर, किसन मोहुर्ले, खुशाल सोयाम,सुधाकर सोनटक्के, निरंजन गोंधळेकर, सुरेखा बिलकुलवार, वंदना गेडाम, सविता दानव,अशोक गेडाम, शंकर गौतरे, संजय बालकुंडे, अमोल चटप, बादल कोडापे ऋषी कुडमेथे, एकनाथ नालमवार प्रकाश घोसले,वसंत नागोसे, नंदू बोबडे, भाऊराव टेकाम, रामराव टेकाम,संदीप सुरपाम, मनोहर बुरबुरे,अशोक पवार, शोभा पवार, बाबुलाल टेकाम,मारुती शिरबंदी,पुरुषोत्तम पाटील, श्यामराव जाधव, गुलाब मेश्राम, देविदास आत्राम, भीमाबाई शिंदे, अंकलू, गोंलावर, अर्जुन शेडमाके, सुभाष नांदेकर, प्रकाश संकरवार, मारुती कुमरे, लक्ष्मण आत्राम, सुभाष कोडापे, रामचंद्र सिडाम, अय्या आत्राम,संतोष टेकाम, अभिमान मेश्राम, भीमराव आत्राम, किसन करपते, महेश मन्ने,हुसेन आत्राम, गजानन बोरकर, दिलीप कुमरे,मारुती कुमरे,संतोष आगरकर आदींनी केली आहे.