घुग्घुस शहरातील अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याच्या कामामध्ये गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि संभाव्य भ्रष्टाचाराबाबत तक्रार.
माजी उपसरपंच सुधाकर बांदुकरकर यांचा नगर परिषदेत आरोप
घुग्घुस : परिषदेमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचे काम करण्यात आले. या कामामध्ये खालीलप्रमाणे गंभीर अनियमितता, निष्काळजीपणा व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून आले असून त्याबाबत माझी खालील तक्रार आहे:
1. घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडिया, गांधी चौक ते स्नेहप्रभा मंगल कार्यालय (विद्या टॉकीज) पर्यंत, तसेच गांधी चौक ते पोळा मैदान, व डॉ. वराटे ते डॉ. ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत अंडरग्राउंड केबल टाकण्यात आलेला आहे.
2. तसेच इतर जुन्या वस्तीतील काही वॉर्डामध्ये देखील नगरपरिषदेमार्फत अंडरग्राउंड इलेक्ट्रिक लाईन व स्ट्रीट लाईन केबल टाकण्यात आलेला आहे.
3. या सर्व ठिकाणी टाकण्यात आलेला केबल निकृष्ट दर्जाचा असून, अनेक ठिकाणी तो जमिनीच्या वर दिसत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. 4. अंडरग्राउंड केबल टाकण्यासाठी जेवढ्या खोलीने नाली खोदली पाहिजे, ते शासनाच्या नियमानुसार किमान एक मीटर खोदणे आवश्यक आहे, पण केवळ 6 इंच ते 1 फूट खोदाई करून केबल टाकण्यात आले.
5. नियमबाह्य खोदकामामुळे व अर्धवट झाकलेल्या केबलमुळे जमिनीवरच केबल उघडा पडलेला आहे, ज्यामुळे जीवितहानीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
6. अलीकडील घटनेमध्ये, डॉ. वराटे हॉस्पिटल ते डॉ. ठाकरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या मधोमध, आस्तिक भोगंळे व वासुदेव जोगी यांच्या घराजवळ, अंडरग्राउंड केबल उघडा असल्यामुळे एका गाईला करंट लागला. सतर्क नागरिकांच्या लक्षात आल्याने व वेळेवर एमएसईबी लाईनमनना माहिती दिल्यामुळे तात्काळ लाईन बंद करून त्या गाईचे प्राण वाचवण्यात आले.
7. जर या घटनेत गाईच्या ऐवजी एखाद्या लहान मुलाला, व्यक्तीला किंवा नागरिकाला करंट लागला असता, तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. याची जबाबदारी कोण घेणार?
8. यावरून स्पष्ट होते की, अंडरग्राउंड केबल टाकताना नगरपरिषद व इलेक्ट्रिक विभागाचे नियम मोडले गेले आहेत. आणि या कामामध्ये नगरपरिषदेचे संबंधित अभियंते, अधिकारी, ठेकेदार यांनी संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे, असा आमचा ठाम संशय आहे.
निवेदनातुन खालील मागण्या केला आहेतः
1. या संपूर्ण कामाची सखोल तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी, ज्यामध्ये टेंडर, केबलचा दर्जा, खोदाईची खोली, इस्टिमेट व प्रत्यक्ष काम याची तुलना केली जावी.
2. टेंडर दिलेल्या ठेकेदाराने शासनाच्या मानकांनुसार काम केले नाही, हे आढळल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3. सदर अंडरग्राउंड केबलचे काम शासनाच्या इलेक्ट्रिक सेफ्टी नियमांचे उल्लंघन करते, त्यामुळे भारतीय विद्युत कायदा 2003, व भारतीय दंड संहिता कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू किंवा इजा) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करतो.
4. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सदर अंडरग्राउंड केबल त्वरित काढून, शासनाच्या मानकांनुसार योग्य खोलीच्या नालीमध्ये व योग्य दर्जाच्या केबलसह पुन्हा नव्याने टाकण्यात यावे.
5. सदर कामासाठी टेंडर ज्या ठेकेदाराला देण्यात आलेला आहे, त्याच्याकडून संपूर्ण काम पुन्हा नव्याने करून घेतले जावे. त्यासाठी नागरिकांच्या देखरेखीखाली व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा नियोजन करावे.
6. सदर ठेकेदारास त्याचे फायनल बिल कोणत्याही परिस्थितीत काम पूर्णतः व गुणवत्तेनुसार न झाल्यास मंजूर करू नये.
7. भविष्यात यामुळे जर कोणत्याही व्यक्तीच्या, लहान बालकाच्या, किंवा जनावराच्या जीविताला धोका पोहोचला तर, नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.
वॉर्डातील नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या कामावर स्वतंत्र लोकनियुक्त समितीने देखरेख करावी.
या कामासाठी खर्च झालेल्या रकमेचा ऑडिट अहवाल सार्वजनिक करावा.
संबंधित अंडरग्राउंड केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर काय व कोणती कारवाई आपण कराल त्या कारवाई अहवालाची प्रत, व खालील अंडरग्राउंड केबल कामाशी संबंधित (अ) टेंडर प्रती, (ब) केबल स्पेसिफिकेशन, (क) कामाच्या तांत्रिक मंजूरीचे सर्व कागदपत्र व ठेकेदाराला कामाचे आजपर्यंत किती बिल दिल्या गेले व किती बाकी आहे त्याबाबत रकमेसह, अर्जदारास लेखी माहिती देण्यात यावे.
भविष्यातील कोणतेही सार्वजनिक काम करताना वॉर्डस्तरीय सार्वजनिक सल्लागार व देखरेख करावि.