घुग्घुस शहरातील आरो प्लांटमधील थंड पाण्याचा चिल्लर पार्ट बंद पडल्यामुळे होणाऱ्या गैरसोयी
घुग्घुस नगर परिषद अंतर्गत शहरातील विविध वार्डामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी १५ लिटर पाणी १० रुपये दराने शुद्ध व थंड स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी आरो प्लांट्स बसविण्यांत आले आहेत. तथापि, सध्या शहरातील काही मोजक्या आरो प्लांट्स कार्यरत असूनही त्यामधून थंड पाणी मिळणे बंद झाले आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधित आरो आरो प्लाटेमा प्लांटमध्ये “चिल्लर” नावाचा थंड पाणी निर्माण करणारा भाग मागील चार महिन्यांपासून बिघडलेला आहे.
विशेषतः, वार्ड क्रमांक २, वस्ती कॉलरी नं. २ रोडकडे जाणाऱ्या व शिवभोजन केंद्राजवळील आरो प्लांट सतत बंद स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ शुद्ध नव्हे तर थंड पाणी मिळण्याच्या हक्कापासून वंचित रहावे लागत आहे.
नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषद पाणीपुरवठा फिटर श्री. सचिन माशिरकर तसेच संबंधित ठेकेदार यांना याबाबत तोंडी माहिती दिली आहे. परंतु आजतागायत कोणतीही दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यात आलेली नाही.
या परिस्थितीमुळे आम्ही खालील मागण्या करीत आहोतः
1. सदर आरो प्लांटमध्ये तात्काळ “चिल्लर” पार्ट बसवून नागरिकांना थंड पाण्याची सुविधा बहाल करण्यात यावी.
2. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी निश्चित करून त्याचे टेंडर रद्द करण्यात यावे किंवा बिलामधून कपात करण्यात यावी.
3. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.










