सुधाकर बांदुरकर माजी, उपसरपंच ग्रा पं घुग्घुस यांची निवेदनातुन मांगणी
पांढरकवळा/वणी सदर रोड (करंजी-वणी-घुग्घुस-पडोली मार्ग) आपल्या कार्यक्षेत्रात येतो.सदर मार्गावरील म्हातारदेवी घुग्घुस सब स्टेशन ते मुगोंली दरम्यान रोडच्या बाजूला 33 केव्ही केबल इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम घुग्घुस WCL स्टेडियम आणि सुभाष नगर कॉलनी समोरील रोडवर सध्या प्रगतीपथावर आहे.
परंतु सदर कामे नियम बाहय होत असुन बोगस काम करताना खालील त्रुटी व अपायकारक बाबी निदर्शनास दिसुन येत आहेत:
1.सुरू असलेल्या खोदकामात फक्त 1 ते दीड फूट गड्डे खोदून केबल टाकली जात आहे, जे अत्यंत अपुरे असून शासकीय इलेक्ट्रिक डिपार्टमेंट व PWD च्या कार्यपद्धतीनुसार सुसंगत वाटत नाही.
2.नवीन रीतनुसार ज्या जागेवर गड्डे खोदुन केबल टाकली जात आहे,त्याच ठिकाणी पुर्वी घुग्घुस नगरपरिषद व WCL कॉलनीचा मुख्य पाणीपुरवठा पाइपलाईन आधीच अस्तित्वात आहे.
त्यामुळे भविष्यात पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही।मोटा बाध्य निर्माण होऊ शकतो। म्हणून सदर केबल टाकण्याचे काम PWD व विद्युत विभागाच्या नियमानुसार पूर्ण खोलीने व अति सुरक्षतीने अंतर राखून केले जात आहे की नाही याची तात्काळ चौकशी करण्यासाठी शब्द उचलले जात आहेत। तसेच पाण्याच्या पाइपलाईनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठेकेदारास योग्य सूचनाही देण्यात यावे. नागरिकांच्या हितासाठी या कामावर योग्य नियंत्रण व मार्गदर्शन ठेवण्यात यावे. अदी निवेदन मार्फत सुचना देऊन बांधकाम विभाग उपअभीयंता,पांढरकवळा, वणी,जि, यवतमाल यांच्या कडुन मा़गणी करण्यात आली.