महाराष्ट्र शासन हा गरीब जनते विरोधी असल्यामुळेच ग्रामीण रुग्णालय सुरू होत नाही : राजुरेड्डी

2

महाराष्ट्र शासन हा गरीब जनते विरोधी असल्यामुळेच ग्रामीण रुग्णालय सुरू होत नाही : राजुरेड्डी



ग्रामीण रुग्णालया करीता काँग्रेसचे आत्मक्लेश आंदोलन संपन्न


मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या फोटोला साकळे घालीत केली विनंती


 घुग्घूस : एकावर्षांपूर्वी शहरात निर्माण झालेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत ही शोभेची वस्तू झालेली आहेत.
तीस खाटाचा ग्रामीण रुग्णालय तातळीने सुरू करा यामागणी करीता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वा खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 01 वाजता आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
रुग्णालयाच्या इमारती समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमे समोर ग्रामीण रुग्णालय सुरू करावा याकरिता सद्बुद्धी यावी म्हणून टाळ वाजवीत विनंती करण्यात आली
व यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र शासन मुर्दाबादचे घोषणा देण्यात आल्या
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी भाजपा शासनावर जोरदार हल्ला चढवीत गरीब विरोधी असल्याचा ठपका ठेवीत नागरिकांना हेतूपूर्वक आरोग्य सेवा देत नसल्याचा ठपका ठेवला केंद्र शासनाच्या आयुष्यमान योजना ही फसवी असून देशातील 600 रुग्णालयाने या योजने अंतर्गत उपचार करण्यास नकार दिलेला आहेत.
कोरोना काळानंतर सर्वात जास्त लक्ष हे आरोग्य यंत्रणावर देणे गरजे असतांना भाजपाने फक्त आमदार खरेदी करण्यावरच लक्ष दिल्याचे आरोप ही रेड्डी यांनी केले आहेत.
यास्मिन सैय्यद, दिप्ती सोनटक्के व श्वेता आवळे या महिला व तरुणीने ही शासनाला चांगलेच धारेवर धरले
ग्रामीण रुग्णालयाचे महिलांना असलेली गरज व महिलांना होणारा त्रास ही त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असून शहरात सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रच सुरू आहेत.
महिलांना गरोदरपणात प्रसूतीच्या प्रसंगी सिजर ऑपरेशन करीता जीवघेण्या कळा सोसत चंद्रपूर येथे जावे लागत असून साधा एक्सरा ही प्राथमिक आरोग्य केंद्रात होत नाही
याकरिता काँग्रेसतर्फे आंदोलन छेळण्यात आला आहेत.
सदर आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, निशा शेख,मंगला बुरांडे, शिल्पा गोहील, प्रीती तामगाडगे, पूनम कांबळे,ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,शेख शमिउद्दीन, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, मोसीम शेख, देव भंडारी,अरविंद चहांदे,सैदू भाई,रोहित डाकूर, सुनील पाटील,भास्कर सोनेकर, दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप,निखिल पुनघंटी, कपिल गोगला,शहशाह शेख,दिपक कांबळे, बोधिराज कांबळे, गजानन उमाटे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे, नामदेव खांदनकर,बंडू दुर्योधन, जोया शेख, भाविका आटे, पपीता वासेकर, आयेशा शेख, नंदा आत्राम, निलिमा वाघमारे, अलका जुनारकर,वर्षा पाटील, चंदा दुर्गे,चंदा जिवनकर,व मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here