जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन निमित्ताने माकपचे जनआक्रोश रॅली व मेळावा संपन्न
जनसुरक्षा कायदा रद्द करा तसेच शेतकरी कामगारांचे प्रश्नावर तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
_____________
पाटणबोरी : – ९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे निमित्ताने पाटणबोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार मंच चे संयुक्त विद्यमाने जन आक्रोश रॅली काढून मेळावा घेण्यात आला. या रॅली व मेळाव्याचा अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. अनिता खुनकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. मनोज काळे, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. सदाशिव आत्राम, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. रामभाऊ जिद्देवार, कॉ. बादल कोडापे, कॉ. सुरेखा बिलकुलवार उपस्थित होते.
ही जनआक्रोश रॅली राम मंदिर येथून काढण्यात येऊन पाटणबोरी येथील नायब तहसील यांचे कार्यालय पर्यंत येऊन तिथे त्याचा मार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर रॅली कालिका मंदिर पर्यंत काढण्यात आली. कालिका मंदिर सभागृहात मेळावा घेण्यात आला. ही जन आक्रोश रॅली आदिवासी संस्कृतीचा पारंपरिक डफडे व बासुरी चा वाद्यांच्या गजरात नृत्य करीत तसेच शेतकरी, कामगारांचे, आदिवासी जनतेचे,प्रश्नावर तसेच जनसुरक्षा कायद्याचा विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली.

या मेळाव्याला सुरुवातीला कॉ. शामराव जाधव यांनी क्रांतिकारी गीते सादर केली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात दिवाकर दाडांजे, विजय आत्राम, दिलीप कुमरे, महादू मेश्राम, अंकुलू गोंलावार पाच आदिवासी समाज कार्यकर्त्यांचा शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
रॅली व मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी पुंडलिक ढुमणे, श्रीकांत तांबेकर, किसन मोहुर्ले, खुशाल सोयाम,सुधाकर सोनटक्के, निरंजन गोंधळेकर, सुरेखा बिलकुलवार, वंदना गेडाम, सविता दानव,अशोक गेडाम, शंकर गौतरे, संजय बालकुंडे, अमोल चटप, बादल कोडापे ऋषी कुडमेथे, एकनाथ नालमवार प्रकाश घोसले,वसंत नागोसे, नंदू बोबडे, भाऊराव टेकाम, रामराव टेकाम,संदीप सुरपाम, मनोहर बुरबुरे,अशोक पवार, शोभा पवार, बाबुलाल टेकाम,मारुती शिरबंदी,पुरुषोत्तम पाटील, श्यामराव जाधव, गुलाब मेश्राम, देविदास आत्राम, भीमाबाई शिंदे, अंकलू, गोंलावर, अर्जुन शेडमाके, सुभाष नांदेकर, प्रकाश संकरवार, मारुती कुमरे, लक्ष्मण आत्राम, सुभाष कोडापे, रामचंद्र सिडाम, अय्या आत्राम,संतोष टेकाम, अभिमान मेश्राम, भीमराव आत्राम, किसन करपते, महेश मन्ने,हुसेन आत्राम, गजानन बोरकर, दिलीप कुमरे,मारुती कुमरे,संतोष आगरकर आदींनी परिश्रम घेतले. तर नेहमी सतर्क राहून सर्व कार्यक्रमात सहकार्य करणारे व भोजनाची व्यवस्था करणारे, संदीप सुरपाम, अशोक मंत्रिवार, अमोल शेंद्रे, प्रशांत लसनते यांचा पक्षाच्या सेक्रेटरी यांच्या हस्ते पुष्प गुचछा देऊन सत्कार करण्यात आला.










