गायीच्या किंकाळ्यांनी हादरले गाव वाघाचा हल्ला

52

गायीच्या किंकाळ्यांनी हादरले गाव वाघाचा हल्ला



नितेश केराम
कोरपना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वनप्रान्यांचा धोका वाढत असून मांडवा गावाजवळील खडकी मार्गांवर एका वाघाने गाईवर हल्ला केल्याची घटना घडली आहे 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 सुमारास ही घटना घडली नामदेव लसंते याची गाय चराईसाठी या परिसरात आली असताना दबा ध रुन बसलेल्या वाघाने तिच्या मान्यवर हल्ला केला ज्यामुळे ती गँभीर जखमी झाली
गायीच्या कींकाळ्या ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दशहत पसरली आहे गेल्या महिनाभरापासून या वाघाने परिसरात अनेक जनावरांवर हल्ले केल्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागकडे तातडीने या वाघाचा बंदोबस्त करण्यातची मागणी केली आहे
वन विभागाच्या माहितीनुसार क्षेत्र सहायक कोरपना यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल गेडाम आणि कडेल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि एकटे बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here