“एक संध्या एकतेच्या नावानं” – राष्ट्रीय मुशायरा व कवी संमेलन
चंद्रपूर, १६ ऑगस्ट २०२५ — साहित्य व संस्कृतीच्या संगमाला समर्पित भव्य राष्ट्रीय मुशायरा व कवी संमेलन इदारा अदबे इस्लामी हिंद, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, जटपूरा गेट, चंद्रपूर येथे शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ शायर जनाब अब्दुल सत्तार आतिश (चंद्रपूर) भूषवणार असून, सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रख्यात नज़्मगो जनाब मो. सोहेल अंसारी (नागपूर) पार पाडतील.
विशेष उपस्थिती व प्रमुख अतिथी:
जनाब रफीक कुरैशी साहेब (नाजिम, जिल्हा जे.आय.एच., चंद्रपूर)
जनाब खुशाल तेलंग साहेब (अध्यक्ष, सद्भावना मंच, चंद्रपूर)
शायर व कवीगण:
डाॅ. समीर कबीर (नागपूर), अज़मत राही (इलाहाबाद), नईम अंसारी (नागपूर), रिज़वान सिवानी, अनु मातंगी (बल्लारपूर), बाबर शरीफ (नागपूर), डाॅ. गोपाल मुंधडा, मुहम्मद रईस सनम, भारत चंदेल (शंकरपूर), इरफान शेख (चंद्रपूर) यांच्यासह देशभरातील अनेक प्रख्यात शायर व कवी आपापल्या रचना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील.
आयोजक: इदारा अदबे इस्लामी हिंद, चंद्रपूर।
हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्या ठरणार आहे, ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील शायर आणि कवी आपापल्या नजाकतदार ग़ज़ला, नज़्म आणि कविता सादर करतील.
सर्व साहित्य, शायरी आणि कविता प्रेमींनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










