श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या विवीध शाळांचे संयुक्तपणे स्वातंत्र्यदिन समारोह संपन्न
वणी*— येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्या लय व औद्योगिक प्रशीक्षण केंद्राचे संयुक्तरित्या संस्थेच्या भव्य पटांगणात स्वातंत्र्यदीन समारोह उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा सर समारोहाचे अध्यक्षस्थानी होते तर वणी पब्लीक स्कुलचे प्राचार्य राकेशकुमार देशपांडे सर,राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्या लयाचे मुख्याध्यापक अभय पारखी सर व राजश्री शाहू महाराज प्रायव्हेट इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे प्राचार्य अतुल राजगडकर सर मंचावर उपस्थित होते. प्राचार्य राकेशकुमार देशपांडे सर यांनी ध्वजारोहण केले.यावेळेस विद्यार्थ्यांनी विवीध उपक्रम,देशभक्तीपर सांस्कृतीक कार्यक्रम सादर के लेत.भाषणे, लेझीम नृत्य व वेषभुषेद्वारे विवीध देशभक्तांचे जिवंत प्रतीकृती देखावे सादर केले.शेवटी अध्यक्षीय मार्गदर्शनात चचडा सरांनी सांगीतले कि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतीकारकांनी जिवाचे बलीदान देऊन हा देश स्वातंत्र्य केला,या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याची जबाबदारी नवीन पिढीने घेतली पाहिजे असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी कु. जिगीषा कुलमेथे व कु .आशा प्रजापती हिने केले.तर आभार प्रदर्शन राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आकांक्षा तिवारी हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.










