काँग्रेसच्या ओपन चॅलेंजने भाजपाची घाबरगुंडी उडाली!
भाजपा अध्यक्ष संजय तिवारी मैदानात आलाच नाही!
घुग्घूस : देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात निवडणूक आयोगाने मतदार यादीत भोंगळपणा करून भाजपाला निवडणुकीत विजयी केल्याचा आरोप पुराव्यासह देशाला दाखविले या अनुषंगाने घुग्घूस काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी चंद्रपूर विधानसभेतील ग्रामीण व घुग्घूस शहराच्या मतदार यादी तपासल्या असता मतदार यादीत प्रचंड भोंगळ कारभार दिसून आला केमिकल वॉर्ड क्रं 06 मध्ये 350 क्रमांकाच्या एकाच घराच्या पत्त्यावर 119 मतदार राहत असल्याचे निवडणूक आयोगाचे यादीतून निरदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेऊन भंडाफोड करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली देशभरातील मीडिया हाऊसचे कॅमेरे घर क्रं 350 कडे वडली
या घटनेने अस्वस्थ झालेलं भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संजय तिवारी यांनी काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे अशी आश्याची फेसबुक पोस्ट टाकली यात निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही पारदर्शक आणी कठोर नियमावली नुसार व घरोघरी जाऊन पूर्ण तपासणी करूनच नावे नोंदवित असतात त्यामुळे हे शक्य नसून काँग्रेस नागरिकांना भ्रामक बातम्या पसरवीत असून नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन केले.
संजय तिवारीच्या या सोशल मीडियावरील आवाहनाला स्विकार करून काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व सैय्यद अनवर यांनी तिवारी यांना 15 ऑगस्ट रोजी गांधी चौक घुग्घूस येथे येऊन काँग्रेसला खोटं सिद्ध करावे असे आवाहन केले.
आज 15 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते मतदार याद्या घेऊन सकाळी 10 : 30 वाजता पासूनच गांधी चौकात ठाण मांडून बसले काँग्रेस नेत्यांना समर्थन देण्यासाठी तालुका अध्यक्ष अनिल नरुले हे सुद्धा गांधी चौकात उपस्थित झाले.
मात्र भाजपा अध्यक्ष संजय तिवारी व भाजपाचा निवडणूक आयोगाला समर्थन देणारा व समाज माध्यमावर पोकळ गप्पा मारणारा एक ही पदाधिकारी कार्यकर्ता गांधी चौकात भटकला नसल्याने भाजपा कसा खोटा प्रचार करतो उघड झाला व भाजपाचा पितळ उघड पडला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, पुनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, वैशाली दुर्योधन, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, जोया शेख,देविदास पुनघंटी,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,सुनील पाटील, दिपक पेंदोर,अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी,दिपक कांबळे, कुमार रुद्रारप, कपील गोगला, शहशाह शेख,सचिन नागपुरे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व मोठया संख्येने सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व नागरिकगन मोठ्या संख्येने उपस्थित होते.










