“वोट चोरी” के खिलाफ राहुल गांधी के साथ “काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
घुग्घूस : देशातील निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी सोयीस्कर होईल अश्या पद्धतीने मतदार यादीत भोंगळपणा करून काँग्रेस समर्थीत मतदारांचे मतदार यादीतून नावे कमी करून तसेच भाजपा समर्थित बोगस मतदार मतदार यादीत जोडून मतचोरी करून
भाजपाला विजय मिळवून देत देशातील लोकशाहीची हत्या करीत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार देशासमोर ठेवला निवडणूक आयोगाच्या या भोंगळपणाचे देशातील नागरिकांना माहिती व्हावी मतचोरी विरोधात जागृती व्हावी याकरिता घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2025 रोजी गांधी चौक घुग्घूस येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात व तालुका अध्यक्ष अनिल नरुले यांच्या उपस्थित निवडणूक आयोगाच्या मतचोरी विरोधात ” वोट चोरी के खिलाफ राहुल गांधी के साथ हू ” हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, पुनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, वैशाली दुर्योधन, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, जोया शेख,देविदास पुनघंटी,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,सुनील पाटील, दिपक पेंदोर,अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी,दिपक कांबळे, कुमार रुद्रारप, कपील गोगला, शहशाह शेख,सचिन नागपुरे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व मोठया संख्येने सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व नागरिकगन मोठ्या संख्येने उपस्थित होते.










