मशाल यात्रेत मोदी विरोधात घोषणाबाजी केल्याने काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल
चंद्रपूर : देशातील विरोधीपक्षाचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग हे मतदार यादीत भोंगळपणा करून भारतीय जनता पक्षासाठी मत चोरी करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करून निवडणूक आयोगाचा बोगसपणा देशासमोर उघडा केला
त्याच पाठो – पाठ घुग्घूस काँग्रेस कमेटीने शहरातील 350 क्रमांकाच्या एकाच घरात 119 मतदारांच्या नोंदणी केली असल्याचा भंडाफोड केला असता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली देशातील व जिल्ह्यातील मतदार यादीतला भोंगळपणा उघड पडल्यानंतर देशात होत असलेल्या मतचोरीचा व निवडणूक आयोगाचा भोंगळपणाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी व चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी. आ.जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व शहर जिल्हा अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यातर्फे 14 ऑगस्ट 2025 रोजी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक ते जटपुरा चौक पर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात आली.
सदर यात्रेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग व मोदी शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे घोषणाबाजी केल्या या मशाल यात्रेचे व्हिडीओज सामाजिक माध्यमावर प्रसारित झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याकडे तक्रार केली असता सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे घुग्घूस काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिल नरुले, कामगार नेते सैय्यद अनवर, चंद्रपूर काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,काँग्रेस नेते दिपक मित्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर गुन्हे निवडणूक आयोगाचा भोंगळपणा बाहेर काढल्यामुळेच गुन्हे दाखल केल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे.










