लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनकडून आरोग्य किटचे वितरण – आशा कार्यकर्त्यांच्या सेवेला बळ

31

लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनकडून आरोग्य किटचे वितरण – आशा कार्यकर्त्यांच्या सेवेला बळ



घुग्घुस : ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा असलेल्या आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने, लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनने एक विशेष उपक्रम राबवत आरोग्य किटचे वितरण केले. या किटमुळे आशा कार्यकर्त्यांचे काम अधिक सुलभ आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) चे उपाध्यक्ष श्री. पवन मेश्राम आणि उपाध्यक्ष श्री. गुणाकर शर्मा तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगिलवार, लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनचे उपव्यवस्थापक श्री. दीपक साळवे, डॉ. प्रियांका उपरे (PHS), कुंभरें सर, आणि आशा उपक्रमाचे समन्वयक राठोड सर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर यांनी आशा कार्यकर्त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “घरोघरी आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम आशा सेविका प्रामाणिकपणे करत आहेत. समाजाच्या आरोग्य उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे खांब आहेत.” त्यांनी लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यकाळात प्रत्येक गावातील कामात आशा कार्यकर्त्यांनी फाऊंडेशनला सहकार्य करावे, जेणेकरून सर्व योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे आवाहन केले.
लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देताना श्री. पवन मेश्राम यांनी सांगितले, “आमचं फाऊंडेशन समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विविध स्तरांवर मदत कार्य राबवत आहे. आशा सेविकांना दिल्या जाणाऱ्या या किटमुळे त्यांचे काम अधिक सोपे होईल.”
याप्रसंगी श्री. गुणाकर शर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आरोग्य सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महिलांना सहकार्य करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. हा उपक्रम त्याच भावनेतून राबविण्यात आला आहे.”
या किटमध्ये तापमापक, रक्तदाब मोजणी यंत्र, सॅनिटरी साहित्य, हातमोजे, मास्क आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान अनेक आशा सेविकांना हे किट वितरित करण्यात आले. किट मिळाल्यानंतर उपस्थित आशा सेविकांनी समाधान व्यक्त केले आणि “यामुळे आमचे कार्य अधिक प्रभावी आणि सुकर होईल,” अशी प्रतिक्रिया दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दीपक साळवे यांनी केले, तर अनुराग मत्ते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीरंग पोतराजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तसेच मोफत चालू असलेली ऍम्ब्युलन्स सेवा याबाबत संपूर्ण माहिती डॉ. पायल कोंडेकर डॉ मानसी पेंडतांडे यांनी दिली
हा उपक्रम लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे आणि यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला एक मोठे बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here