वणी येथे म.रा.किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद आयोजन 

65
  1. वणी येथे म.रा.किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद आयोजन 


वणी*– महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे 7 सप्टें. ला दु.12 वाजता शेतकरी मंदीर येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परीषदेला मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ.राजन क्षिरसागर(परभणी),प्रसिद्ध अर्तज्ञथ डाॅ.श्रिनीवास खांदेवाले(नागपूर),शेतकरी नेते काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती),राज्याध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी (धुळे),राज्यसचिव काॅ.अशोक साेनारकर(अमरावती) आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिषदेसाठी सर्व शेतकऱ्यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या परिषदेचे मुख्य मुद्दे–1)स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा.
2)कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी देणे.
3)आयात-निर्यात धोरण शेतकरी हिताच्या दृष्टीने ठरवणे.
4)पीक विमा कंपनी सरकारी असावी व नियम स्थानिक नैसर्गिक परिस्थिती पाहूनच ठरवावे.
5)सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करणे, खुल्या बाजारातील लूट रोखणे.
6)जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करण्याचा कायदा करण्यात यावा.
‌ ही परिषद केवळ मागण्यांची यादी नसून शेतकरी हक्कासाठी ठाम संघर्षाची सुरुवात आहे. सर्व प्रगतिशील, लढाऊ, पुरोगामी विचारसरणीचे शेतकरी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावून शेतकरी चळवळ मजबूत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलतर्फे काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,गणेश कळसकर,बंडु गोलर,वासुदेव गोहणे,रवि गोरे,गणेश शिटलवार,पंढरी मोहीतकर,पांडुरंग ठावरी,राकेश खामणकर,अथर्व निवडींग,सौ.छाया गावंडे,सुरेखा हेपट,प्रा.धनंजय आंबटकर,गुलाबराव उमरतकर,दिपक माहुरे,दिवाकर नागपुरे,संजय भालेराव,प्रा.प्रविण बंसोड,विजय ठाकरे,ऋषी उलमाले,दिलीप महाजन,अॅड.अरुण जवके,अमोल गौरशेट्टीवार,पि.जी.गावंडे,प्रदीप नगराळे, लक्ष्मणराव खंडारे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here