जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन
चंद्रपुर :
जिल्हा विधी सेवा प्राधिकvरण, चंद्रपूर व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३/०८/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी एस. भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या कार्यालयातील कॉन्फरंस हॉलमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात श्री. एस. एस. इंगळे साहेब, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, चंद्रपूर, श्री. पी. पी. कुलकर्णी साहेब, मुख्य न्यायदंडाधीकारी, चंद्रपूर, श्री. कोमल सुर्यवंशी, उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. पवन गुज्जर साहेब ईत्यादिंनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना विविध कायद्याबाबतचे मार्गदर्शन केले. सदरील प्रसंगी मोठ्या संख्येने विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थीत होते. सदरील कार्याकमाचे संचालन व आभार प्रदर्शन, अॅड. महेंद्र बी. असरेट यांनी केले.










