महाराष्ट्र नवनिर्माण सेना घुग्घुस तर्फे तान्हा पोळा उत्सव – २०२५
बालगोपालांच्या आनंदात मा.मनदीप रोडे यांनी तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या…_
घुग्घुस, दि. २३ ऑगस्ट २०२५ :
दरवर्षीप्रमाणे यंदाही गांधी चौक शहरात
जनसंपर्क कार्यालय मनसे घुग्घुस
भव्य तान्हा पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. परंपरा कायम ठेवत यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन- शहर अध्यक्ष घुग्घुस सुमित कोहळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर पंकज राजपूत, शहर उपाध्यक्ष घुग्घुस निशांत ठाकरे, व
शहर उपाध्यक्ष, निखिल बोबडे
कामगार सेना अध्यक्ष श्रीकांत देठे कपिल शिरसागर शुभम तिगलवार आदित्य गज्भ्ये , व इतर मनसैनिक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या पारंपरिक तान्हा पोळ्याच्या सोहळ्यात मा.मनदिप भाऊ रोडे जिल्हाध्यक्ष मनसे, शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, संदीप आरडे यांनी अध्यक्षपद भूषवून उपस्थित राहून बालगोपालांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या.
मा. मनदीप भाऊ रोडे व बाळा चंदनवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले तान्हा पोळा व बैल पोळा हा उत्सव करणे आपली संस्कृती आहे. या निमित्ताने आपण सर्वधर्म समभाव जागृत करत एकत्र येतोय व एकोपा निर्माण होतो. आज बालगोपालांनी दाखवलेली सर्जनशीलता, छोट्या नंदीबैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून मन भरून आलं. आपल्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमातून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतात.
या सुंदर आयोजनाबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो तसेच तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना घुग्घुस तर्फे एक छोटीशी भेट वस्तु देत आहे, ती कृपया स्वीकारावी.”असे
पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत सांगितले
“आपली परंपरा, आपला सण – याचं जतन व संवर्धन










