दारू दुकानाविरोधात बेमुदत आमरण उपोषण
नितेश केराम
चंद्रपूर 27 ऑगस्ट 2025 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषितहोण्यापूर्वी 350 बार व देशी दारूचे दुकान होते दारूबंदी झाल्यावर अनेकांनी आपली दुकानें दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित केली होती 7 वर्षा नंतर जिल्ह्याची दारूबंदी उठली आणि उत्पादन शुक्ल विभागाने दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना वाटप करण्याचे काम सुरु केले 7 वर्षानी जिल्ह्यात तबलं 750 च्या वर दारू दुकानाची संख्या वाढली आहे तसेच कोरपना मध्ये नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी देशी दारूच्या दुकानाला बेकायदेशीर ना हरकत प्रमाणापत्र देत गावातील वातावरण खराब करण्याचे काम केले असा आरोप कोरपना शहर वासियांनी केला देशी दारू दुकानात तात्काळ गावातून हटविण्यात यावे या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे कोरपना तालुका उपाध्यक्ष पद्माकर नथूजी मोहितकर 28 ऑगस्ट पासून कोरपना तहसील कार्यलयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे










