जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
चंद्रपुर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंन्द्रपुर व सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६/८/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती समृद्धी एस. भिष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपुर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात श्री. एस.एस.ईगळे साहेब, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधिश व स्तर चंन्द्रपुर, श्री.पि.पि.कुलकर्णी साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी, चंन्द्रपुर, श्रीमती प्रभावती टि. ऐकुर्के मॅडम, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, चंन्द्रपुर, अँड. महेन्द्र बी. असरेट यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्याबाबतचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ठाकुरवार मॅडम, प्रा. कापसे मॅडम, प्रा. नरखेडकर मॅडम, प्रा. बोरकुटे, प्रा. रामटेके सह समस्त प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राठोड सरांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आडे सरांनी केले.










