भारतीय जनता पार्टी, राजुरा विधानसभेच्या नविन जनसंपर्क कार्यालयाचा शुक्रवारी होणारा लोकार्पण सोहळा रद्द!

41

भारतीय जनता पार्टी, राजुरा विधानसभेच्या नविन जनसंपर्क कार्यालयाचा शुक्रवारी होणारा लोकार्पण सोहळा रद्द!

गुरुवार दुपारी राजुरा तालुक्यातील मौजा कापणगांव जवळ राजुरा-गडचांदूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाचगांव येथील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरंतर ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यासोबतच जखमींच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठीही प्रार्थना करतो.

आपल्या सर्वांना कल्पना आहेच; की शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी राजुरा येथील माझ्या नविन भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण नियोजीत होते. परंतू आज घडलेली दुर्घटना ही अतीशय वेदनादायी असून अशा दुःखाच्या प्रसंगी उद्याचा लोकार्पण सोहळा पार पाडणे मनाला पटत नाही.
त्यामुळे शुक्रवारी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात येत आहे, अशी अधिकृत माहिती मी या माध्यमातून आपणा सर्वांना देत आहे.
या दुःखद प्रसंगी मी मृतांच्या परिवारासोबत भक्कमपणे उभा असून कार्यालयाच्या लोकार्पणाची पुढील तारीख माझ्या कार्यालयाकडून यथावकाश जाहीर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी!

*- आमदार देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here