धूम स्टाईल बाईक दुचाकीस्वारावर कारवाई करा

9

धूम स्टाईल बाईक दुचाकीस्वारावर कारवाई करा



प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी


*वणी -वणी तालुक्यात दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही बेदरकारपणे चालविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विशेषत वणी-वरोरा महामार्गावर बाईक रायडर्सच्या टोळ्या दररोज आणि सुट्टीच्या दिवशी धूम स्टाईलने दुचाकी चालवत निघतात. अशावेळी इतरांची तर दूरच, स्वतःच्या जीवाचीही काळजी हे बाईक रायडर्स घेत नाहीत. त्यामुळे या टोळ्यांना धूम स्टाईल बाईक रायडिंगचे एकप्रकारचे व्यसनच जडल्याचे दिसत आहे. त्यांच्या या धुंदीमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना घडत आहे. अशा अपघातांमध्ये काहींचा बळी गेला तर,अनेकांना अपंगत्व आले आहे.काहींना प्राणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे बेदरकार, बेशिस्तपणे दुचाकी दामटणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली.प्रहार उपजिल्हाप्रमुख मोबिन शेख,तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांच्या नेतृत्वात शहरप्रमुख अहमद सैय्यद,उपतालुकाप्रमुख जनार्दन टेकाम,रघुवीर कारेकर तालुकाप्रमुख प्रहार शेतकरी संघटना,शहरप्रमुख वाहतुक आघाडी सचिन राखुंडे,आमीन शेख,सोहेल खान,भरत ठाकुर,विजय बुरांडे,समीर सैय्यद,आमीन शेख,उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here