कोरपना तालुक्यात दुःखद घटना वीज खांबाचे तार तुटून शेतकऱ्यांचा मृत्यू
नितेश केराम कोरपना 3 सप्टेंबर 2025 विधुत करंट तुटून शेताच्या तार कुंपणावर पडल्याने विधुत करंट लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर तिघे जन जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील रायपूर येतील शेत शिवारात मंगळवार दि 2 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली तुकाराम रामचंद्र आत्राम (55) रा रायपूर असे मृतकाचे तर गीता अनिल आत्राम, (47) रा रायपूर अशी जखमीची नावे आहे सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने विधुत खांबाच्या विधुत तारा शेताच्या तार कंपाऊंड वर तुटून पडल्या होत्या सकाळी शेतात शेताकामासाठी गेले असता स्पर्श झाल्याने तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघा जखमीना बांबूच्या साह्याने जवळ असलेल्या नागरिकांनी विधुत ताराच्या अलग केले त्यामुळे सुदै वाने त्यांचे प्राण वाचवले याबाबतची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच मृतदेह उर्वरत तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येते पाठवण्यात आला जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन नैताम पोलीस कर्मचारी राठोड आडे नामदेव पवार करीत आहे यावेळी मृतकाच्या परिवरांना खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार सुभाष धोटे माजी आमदार वामनराव चटप यांनी भेट कुटुंबीयाचे सत्वन केले