राजीव रतनसह वेकोलीच्या अन्य आस्थापनेतील ठेकेदारी कामगारांचे प्रचंड शोषण!
वेकोली निर्धारित किमान वेतन प्रतिदिन 1176 रुपये कामगारांना देतात 175 ते 350 फक्त?
काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून कारवाईचे मागणी!
घुग्घूस : देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळ सुरू आहेत.
मात्र या अमृतकाळात वेकोलीत ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना इंग्रजांच्या काळापेक्षा ही अमानवीय यातना भोगाव्या लागत आहेत.
कामगारांना रेकॉर्डवर पूर्ण वेतन दाखवून त्यांच्या हातात केवळ 175 ते 350 रुपयेच देत असल्याचा धक्कादायक प्रकार वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयातील स्वच्छताकर्मी सिफर, रुग्णवाहिकेतील चालक तसेच वेकोली कॅन्टीन, स्कुल बस, ऍम्ब्युलन्स, व्ही. टी. सि. सेंटर, व्ही. आय. पी. गेस्ट हाऊस, मनोरंजन केंद्र याठिकाणी कार्यरत ठेकेदारी कामगारांना महिन्याला 5000 ते 10,000 इतकेच वेतन दिल्या जाते.
कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कुठे चर्चा केली किंवा तक्रार केली तर कामगारांना कामावरून बंद करण्यात येते.
कोल इंडियाच्या राष्ट्रीय वेतन समझोत्यानुसार ( NCA – 11) कोल इंडिया अंतर्गत येणाऱ्या WCL चे ठेकेदारी कामगारांचे किमान वेतन बेसिकनुसार प्रतीदिन मजुरी श्रेणीनुसार 1176 ते 1266 इतकी ठरविण्यात आलेली आहे.
असे असतांना घुग्घूस क्षेत्रात वेकोली अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने कामगारांचे वेतनावर डल्ला मारण्यात येत असल्याने कामगारांवर होत असलेल्या अतोनात आर्थिक छळाच्या
विरोधात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना कामगारांच्या शोषणाची माहिती निवेदनातून दिले असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून कामगारांना किमान वेतनानुसार वेतन देण्याची मागणी केली आहेत.
कामगारांचे आर्थिक शोषण थांबले नाही तर वेकोली व ठेकेदारा विरोधात काँग्रेस तर्फे आंदोलन छेळण्याचा इशारा रेड्डी यांना दिला आहे.










