भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने बौद्ध धम्माचे ग्रंथ वाटप

72

भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने बौद्ध धम्माचे ग्रंथ वाटप



घुग्घुस – आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आयु. किशोर जी तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय बौद्ध महासभा
शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली व यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा वर्षावास निमित्त प्रवचन मालिका राबविण्यात येत असुन दर बुधवारला दुपारी 1 वाजता प्रवचन मालिका घेण्यात येत आहे.
आज बुधवारला मा. प्रा. आयु रवी कांबळे सर यांचा लिखित ग्रंथ संपूर्ण बौद्ध सण, धम्मदर्शन बुद्धं सरणं गच्छामि या तीन ग्रंथाचे घुग्घुस येथील सर्व विहाराला निशुल्क वाटप करण्यात आले त्यामध्ये
1) पंचशील बुध्दं विहार घुग्घुस,
2) सारिपुत्त बुध्दं विहार, गांधी नगर घुग्घुस ,
3) महाप्रज्ञा बुध्दं विहार, इंदिरा नगर घुग्घुस,
4) चैत्यवन बुध्दं विहार शास्त्री नगर घुग्घुस
5) तक्षशीला जनजागृती महिला मंडळ, बैयरम बाबा नगर घुग्घुस
6) आम्रपाली बुध्दं विहार अमराई घुग्घुस 7) नवयुवक बुध्दं विहार कॉलरी नंबर दोन
8) नवबौद्ध स्मारक समिती बहुउद्देशीय संस्था घुग्घुस, 9) मिलिंद वाचनालय जनता शाळा बुध्दं विहार घुग्घुस, 10) सिध्दार्थ गौतम बुद्धं विहार केमिकल वार्ड घुग्घुस, 11) शांती बुध्दं विहार शांती नगर घुग्घुस
12) रमाई बुध्दं विहार नकोडा या सर्व विहारातील अध्यक्ष, सचिव, सदस्यांना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, प्रा. रवि कांबळे, केंद्रीय शिक्षक शंकर वेल्हेकर यांच्या उपस्थितीत यांनी विहाराला ग्रंथ भेट स्वरुपात दान दिले.
ग्रंथ वाटप झाल्या नंतर प्रवचन मालिकेला सुरुवात झाली .
सरणत्य घेऊन या कार्यक्रमाची सागता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत निखाडे यांनी केले
यावेळेस, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त फकरु घागरगुंडे, कोषाध्यक्षा वैशालीताई निखाडे
सरोजताई पाझारे, सविताई मंडपे, दिक्षाताई भगत,
श्याम कुम्मरवार, शिल्पाताई सोंडुले, वैशालीताई भालशंकर, सोहम पाटील, मीना गुडदे ज्योतीताई बेंडले अल्काताई करमणकर, व घुग्घुस येथील सर्व बुध्दं विहार कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here