महाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा वणी येथे राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकरयांची भव्य परिषद संपन्न

47

महाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा वणी येथे राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकरयांची भव्य परिषद संपन्न



वणी -महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे शेतकरी मंदीरात राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकरयांची भव्य परिषद संपन्न झाली.परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ डाॅ.श्रिनिवास खांदेवाले(नागपूर) यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.राजन क्षिरसागर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.करमसिंग राजपूत होते तसेच भाकप राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम भस्मे(अमरावती),राज्य कार्यकरणी सदस्य डॉ.महेश कोपुलवार(गडचिरोली),किसान सभेचे राज्याध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी(धुळे),राज्य सरचिटणीस कॉ.अशोक सोनारकर(अमरावती) हे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड.प्रदीप नागापुरकर(नांदेड),कॉ.ओंकार पवार(परभणी),कॉ.सतिश चौधरी(अमरावती),संजय बाजड(वाशिम),कॉ.रामप्रभु कोरडे(हिंगोली),कॉ.सि.एन.देशमुख (बुलढाणा),कॉ.प्रकाश रेड्डी(चंद्रपुर),कॉ.द्वारका ईमडवार(वर्धा) हे उपस्थित होते.याप्रसंगी परिषदेत कापुस,सोयाबीनच्या प्रश्नावर,शेतकरयांच्या वाढत्या आत्महत्याविषय मार्गदर्शकांनी विस्तृत मार्गदर्शन केले.या परिषदेने विविध ठराव घेऊन, पुढील कृती कार्यक्रम आखुन किसान सभेच्या नेत्रुत्वात शेतकरयांना संघटीत करून आंदोलनात्म वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.परिषदेची प्रस्तावना किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट यांनी केली तर संचालन जिल्हाध्यक्ष कॉ.अनिल घाटे यांनी केले व आभार प्रदर्शन कॉ.सुनिल गेडाम यांनी केले.परिषदेला विविध जिल्ह्यातील प्रतिनिधीसह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.यशस्वितेसाठी कॉ.पंढरी मोहीतकर,गणेश कळसकर,मोरेश्वर कुंटलवार,रवि गोरे,गजानन पैसटवार,पांडुरंग ठावरी,प्रा.धनंजय आंबटकर,अथर्व निवडींग,प्रविण आडे,ऋषी उलमाले,वासुदेव गोहणे,सुरेखा हेपट,शंकर केमेकार,राकेश खामणकर,दत्तु कोहळे,छाया गावंडे,प्रमोद पहुरकर,उत्तम गेडाम,दिनेश शिटलवार,मिलींद रामटेके,शैलेंद्र कांबळे,एकनाथ रायसिडाम,प्रदीप नगराळे,दिनेश पारखीसह असंख्य किसान सभेच्या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here