लोकशाहीची हत्या करणारा जनसुरक्षा हा काळा कायदा रद्द करा : महाविकास आघाडी
घुग्घूस शहरातील गांधी चौकात निषेध आंदोलन संपन्न
घुग्घूस : शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, शिवसेना(उबाठा ) शहर प्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते गणेश शेंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष शरद कुमार ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सरकार विरोधातील बॅनर फलक घेऊन महायुती सरकार भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील महायुती शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधानसभा व विधानपरिषदेत पारित केले असून राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू केल्या जाणार आहे.
महायुती शासन या कायद्याची स्पष्टपणे खुलासा करीत नाही हा कायदा शहरी नक्सलवादाला आळा घालण्यासाठी केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे हा कायदा लागू झाल्यास सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनावर अनिर्बंध कारवाईचे अधिकार सरकारला मिळतील.
बेकायदेशीर संघटना व त्यांचे कृत्य याबद्दल शासनाने स्पष्टता केली नसून मोघम व्याख्या केलेली आहे.
केवळ एक अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार सरकारला मिळेल
संघटना बेकायदेशीर केल्यास त्यांची सर्व स्थावर जंगम मालमत्ता जप्ती करण्यात येईल त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना इतकेच नव्हे तर त्यांच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना सात वर्षा पर्यंत तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळेल.
जमावबंदी मोडल्यास शांततेत चाललेलं मोर्चा, उपोषण, बेकायदेशीर ठरविण्यात येतील कामगार संघटना सरकारी कर्मचारी यांचा संप बेकायदेशीर ठरविल्यास ते सुद्धा कारवाईस पात्र ठरतील सामाजिक चळवळी, जनआंदोलन आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायदाचा वापर केला जाणार सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा हत्यार म्हणून कायद्याचा वापर होईल राज्यातील संसाधने जमीन,जंगल, बंदर, रस्ते, आदी उद्योगपतीना देतांना होणारा जनविरोध दाबण्यात कायदाचा वापर होईल म्हणून अश्या या काळ्या कायद्याचा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
घुग्घूस महाविकास आघाडीच्या वतीने गांधी चौक येथे दुपारी 12 वाजता हातात फलक व बॅनर घेऊन शासना विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे चेतन बोबडे, अमित बोरकर, लक्ष्मण बोबडे, हेमराज बावणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, ज्येष्ठ नेते मुन्ना लोहानी, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, ज्येष्ठ नेते जगन्नाथ आस्वाले, किशोर आवळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन,एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला,शेखर तंगडपल्ली एस्सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, जोया शेख,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, सुनील पाटील, अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप, कपील गोगला, देव भंडारी, दिपक पेंदोर, शहंशाह शेख, संजय कोवे, दिपक कांबळे, अनवर सिद्दीकी, जय मेश्राम,अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.










