जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव चा खो खो संघ ठरला विजेता
नितेश केराम
राजुरा 11 रोजी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या खो खो स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगावच्या मुलींनी विजेतेपद पटकावले या स्पर्धेत मुलींनी उत्कृष्ट खेळाची छाप पाडत प्रतिस्पर्द्याचा पराभव करून विजेतेपद मिळवले व जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेकरीता त्यांची निवड झाली आहे त्यांच्या या कामगिरीत अंबुजा फाऊंडेशनच्या अदानी सिमेंट च्या C S R फ़ंडातून विशेष सहकार्य करून विद्या र्यांना ने आन करण्यात महत्वाची भूमिका बजावली विजेत्या संघातील खेळाडूचे अभिनंदन तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी कल्याण जोगदंड केंद्र प्रमुख पंढरी मुसळे शाळेचे मुख्यद्यापक श्री वीजय अकनुरवार अंबुजा फाऊंडेशनच्या शिक्षण विभाग प्रमुख समन्वयक सरोज आंबागडे निलेश मडावी मंगला चटप रेखा झाडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू बोढाले व तालुका क्रीडा अधिकारी प्रमोद वाघाडे आदी मान्यवरांनी केले
तसेच खेळाडूना घडविण्यासाठी मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक बाळकृष्ण गावंडे व अंबुजा फाऊंडेशन क्रीडा व्यवस्थापन चैताली कनाके यांचाही विशेष अभिनंदन करण्यात आले मान्यवरांनी विजेत्या मुलींना व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या










