लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशनची मोफत रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायिनी; रुग्णांचे वाचले प्राण, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तात्काळ मदत
घुग्गुसः लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) द्वारे चालवल्या जाणाऱ्या लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशन (LIF) च्या दोन मोफत रुग्णवाहिका रुग्ण सेवा-१९१ गरजू आणि गंभीर रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहेत. ही सेवा केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांसाठीच नाही, तर रस्त्यावरील अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांसाठीही वरदान ठरत आहे. या रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध असलेले डॉक्टर रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्रथमोपचार देत असल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. या सेवेचा एक महत्त्वाचा अनुभव नकोडा येथील रहिवासी शत्रुघन गेडाम (वय अंदाजे ५६) यांच्या बाबतीत नुकताच आला. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना तात्काळ घुग्गुस येथील डॉ. कोल्हे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची नाजूक प्रकृती लक्षात घेऊन प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, गेडाम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना खाजगी रुग्णवाहिकेचा खर्च परवडण्याजोगा नव्हता, त्यामुळे त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली.
त्याच वेळी, लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल या त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी डॉ. कोल्हे यांच्या रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांनी गेडाम कुटुंबाची परिस्थिती पाहून तात्काळ रुग्णवाहिकेसाठी फोन केला. लॉयड्सची रुग्णवाहिका केवळ पाच मिनिटांत रुग्णालयात पोहोचली. रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांची स्थिती पाहून तातडीने प्रथमोपचार सुरू केले आणि शत्रुघन गेडाम यांना चंद्रपूरच्या कुबेर रुग्णालयाकडे रवाना केले. वेळेवर उपचारासाठी पोहोचल्यामुळे शत्रुघन गेडाम यांचे प्राण वाचले.
या रुग्णवाहिकेचा उपयोग केवळ गंभीर रुग्णांसाठीच नाही, तर रस्त्यावर अपघात झालेल्या रुग्णांसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत गरोदर महिलांसाठीही होत आहे. लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशनची ही मोफत सेवा अशा लोकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. ज्यांना ऐनवेळी रुग्णालयात जाण्यासाठी आर्थिक किंवा इतर साधनांची कमतरता जाणवते. या रुग्णवाहिकेमुळे आरोग्य सेवेची दरी कमी होण्यास मदत होत असून, या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशनचा हा सामाजिक उपक्रम समाजाला मोठा आधार देत असून, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत. कंपनीचा हा प्रयत्न इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
लॉयड्स इन्फीनाईट फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेचा लाभसर्व गरजू आणि अपघातग्रस्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांनी केले आहे. ही सेवा कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांसाठी उपलब्ध असून, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावाः
९२२६५३१४०४
९२२६५३१४०३
,
,










