जिवती तालुक्यातील 21 हजार 624 एकर जमीन वन क्षेत्रातून वगळली

18

जिवती तालुक्यातील 21 हजार 624 एकर जमीन वन क्षेत्रातून वगळली



मुख्यमंत्र्यासह महसूल मंत्री व वनमंत्र्यासह आमदार देवराव भोंगळे यांचे जिवतीकरांनी मानले पत्रकार परिषदेतून आभार


जिवती- जिवती तालुक्यातील वनक्षेत्रातील समाविष्ट असलेली आणि निर्वरणीकरण झालेले एकूण 21 हजार 624 एकर क्षेत्र वन क्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला आहे यामुळे जीवती तालुक्यातील 22 गावांना मोठा दिलासा मिळाला असून याबाबतचे शासन पत्र नागपूर विभागीय आयुक्त आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे या निर्णयामुळे आकांशीत आणि दुर्गम असणाऱ्या जीवती तालुक्यातील वन हक्क जमिनीच्या बहू प्रलंबित प्रश्नावर आता तोडगा निघाला असून आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्य पूर्व पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे पत्रकार परिषदेतून जिवती वाशीयांनी भावना व्यक्त केलेली आहे.

मागील अनेक वर्षापासून जिवती तालुकावाशी वनसंवर्धन आदी नियम कायद्याअंतर्गत जमिनीच्या हक्कासाठी संघर्षरत होते कागदपत्राची अपूर्तता आणि प्रशासकीय अडचणीमुळे हा प्रश्न शासन दरबारी थडबस्त्यात होता. ज्यामुळे शेतकऱ्याकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क नसून शेतीत गुंतवणूक करणे किंवा सरकारी योजना चा लाभ घेण्यापासून त्यांना वंचित रहावे लागत होते परंतु दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी आमदार देवराव भोंगळे यांनी जीवती तालुक्याच्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन या प्रश्नाच्या निराकरण संदर्भात आपण शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा करणार अशी ग्वाही दिली होती.

*चौकट*
निवडणुकीदरम्यान आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती वाशीयांना शब्द दिला होता मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम जिवती तालुक्यातील वन हक्क पट्ट्या संदर्भात निर्णय घेऊन जिवतिवाशीयांना हक्काचे पट्टे देईन आमदार देवराव भोंगळे 23 नोव्हेंबर 2024 रोजी आमदार म्हणून विधानसभेवर गेले त्यानंतर त्यांनी लगेचच हिवाळी अर्थसंकल्पीय व पावसाळी अशा तीनही अधिवेशनादरम्यान आमदार देवराव भोंगळे यांनी शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वन मंत्री गणेशजी नाईक यांच्या उपचारीक भेटीत या प्रश्नाच्या निकरणा संदर्भात आपल्या शासनाचा ठोस पाऊल उचलावी व अशी मागणी आमदार देवराव भोंगळे यांनी केली आहे. त्यांच्याच या अथक परिश्रमाने हा जठिल प्रश्न मार्गी लागलेला आहे, सर्व जिवती तालुक्याच्या वतीने आमदार देवराव भोंगळे यांचे शतशः आभार मानतो धन्यवाद देतो.

पत्रकार परिषदेतून माहिती पत्रकार परिषदेला उपस्थित जिवती तालुका अध्यक्ष दत्ता राठोड केशव गिरमाजी जिल्हा उपाध्यक्ष महामंत्री भीमराव पवार शहराध्यक्ष राजेश राठोड अशपाक शेख अनुसूचित जाती आघाडी जिल्हा अध्यक्ष सुबोध चिकटे गोविंद टोकरे बालाजी जाधव चंद्रकांत घोडके

महेश देवकते
माजी उपसभापती पं स जिवती भाजपा यु वा मोर्चा जिल्हाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here