पंजाब येथील पूरग्रस्तांसाठी आॅल ईंडीया स्टुडंटस् फेडरेशन(AISF) तर्फे “मदतीचा हात” उपक्रम

40

पंजाब येथील पूरग्रस्तांसाठी आॅल ईंडीया स्टुडंटस् फेडरेशन(AISF) तर्फे “मदतीचा हात” उपक्रम



वणी : यवतमाळ पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे घरे, शेती व दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या आपत्तीग्रस्त बांधवांना मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) वणी व यवतमाळ युनिटच्या वतीने “मदतीचा हात” हा उपक्रम हाती घेण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत वणी, मारेगाव, यवतमाळ शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मदत संकलित करण्यात आली. या मदतीमध्ये आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तू तसेच शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जिल्हाप्रमुख कॉ. अथर्व निवडिंग, राजिक शेख, तेजस दुमोरे, प्रेम ठेंगणे, अयान शाह, भूषण गणवीर, अथर्व जाधव, जय गिरी, प्रथम डोळस, सुजल पवार, रिंकीता आत्राम, देविका शेंडे, सृष्टी, दिपक जाधव आदींनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला.
हा उपक्रम आदर्श महाविद्यालय वणी, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, पंचशील हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगाव, आदर्श हायस्कूल मारेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव तसेच वणी बसस्टॉप परिसरात,सोबतच यवतमाळ शहरात राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे पंजाबमधील पूरग्रस्त बांधवांना दिलासा मिळणार असून, “संकटाच्या प्रसंगी समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात द्यावा” हा संदेश आॅल ईंडीया स्टुडटस् फेडरेशन AISF च्या कार्यकर्त्यांनी समाजापर्यंत पोहोचविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here