पडोली ते घुग्घुस रोडवरील खड्डयांची तातडीने दुरुस्ती करावि :- मनसे चंद्रपुर तालुका उपाध्यक्षचा इशारा
मनसे चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुत यांनी जिला प्रशासन व टोल प्रशासनला निवेदन देऊन मांगणी केली
चंद्रपुर: पडोली ते घुग्गुस रोडवर पडलेल्या गड्ढ्यांबाबत, टोल वसुली असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत पडोली ते घुग्गुस या मार्गावरील रस्ता अत्यंत जीर्ण व धोकादायक स्थितीत आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे गड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार व छोटे वाहनधारक यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत.
या रस्त्यावर टोल वसुली नियमितपणे केली जात असून, नागरिकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. तरीसुद्धा रस्त्याची दुरुस्ती न करणे ही प्रशासनाची व टोल कंपनीची गंभीर बेपर्वाई आहे. जनतेच्या पैशांचा विनियोग न करता, केवळ वसुली करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
निवेदनातुन खालीलपैकी प्रमुख मागण्या :
1. पडोली ते घुग्गुस रोडवरील गड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
2. टोल वसुली करणाऱ्या कंपनीवर कारवाई करून त्यांच्याकडून रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची सक्ती करावी.
3. या रस्त्याच्या दर्जेदार व टिकाऊ दुरुस्तीसाठी स्थायी उपाययोजना करावी.
4. अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाने मदत द्यावी.
घुग्गुस रोड हा दररोज हजारो वाहनधारक वापरत असलेला प्रमुख मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या गड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत दिसतो. यामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अनेक अपघात घडत आहेत.जड वाहनांना गड्ड्यांमुळे वेग कमी करावा लागतो व त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. शालेय बस, रुग्णवाहिका, तसेच कामावर जाणाऱ्या लोकांना रोज या समस्येमुळे वेळेचे नुकसान सहन करावे लागते. गंभीर बाब म्हणजे, या रस्त्यावरून जाताना लहान अपघात तर वारंवार होतातच, पण काही वेळा मोठे अपघात होऊन जीवितहानीचीही शक्यता निर्माण होते.
या गड्ड्यांमुळे फक्त अपघातच होत नाहीत तर वाहनांचेही मोठे नुकसान होते. टायर फुटणे, शॉक ऍब्जॉर्बर तुटणे, इंजिनचे नुकसान अशा समस्या रोजच्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.
म्हणूनच जिला प्रशासन तसेच टोल प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन घुग्गुस रोडवरील गड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करावा ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे..
जर तातडीने योग्य ती कार्यवाही झाली नाही तर मनसे चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुत यांच्या नेतृत्वात नागरिकांकडुन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, याची नोंद घ्यावी.असे इशारा पंकज राजपूत तालुका उपाध्यक्ष चंद्रपुर मनसे यांनी जिला प्रशासन तसेच टोल प्रशासनला निवेदनातुन केली.










