वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
वणी*– वणी तालुक्यातील खाजगी माध्यमीक शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांची वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 14 सप्टें.2025 रोजी एस.बी.लाॅन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.भुपेंद्र देरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणुन श्री.प्रकाश देवाळकर,श्री.राजेंद्र देवतळे,श्री.आत्माराम ताजणे,श्री.अरविंद तिरणकर,श्री.नथ्थु जेऊरकर,श्री.विनोद बुच्चे,श्री.संतोष चिल्कावार,श्री.अरुण पहुरकर,सौ.गाथा पिपराळे,सौ.सीमा सोनटक्के,सौ.अश्विनी टेकाम हे उपस्थित होते.आमसभेत वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.अहवालावर सभासदांनी विस्तृत चर्चा करुन अहवाल मंजुर करण्यात आला व संचालक मंडळाने मांडलेले ठराव बहुमताने मंजुर करण्यात आले.याप्रसंगी यावर्षी शालेय सेवेतुन निवृत्त झालेले श्री.दिवाकर नरुले,श्री.भिमराव तेलंग,श्री.गंगाधर गेडाम,श्री.सुर्यकांत मोरे,श्री.पांडुरंग वैद्य यांचा सत्कार करण्यात आला.तसेच 10 वी,12 वी मध्ये प्राविण्यप्राप्त सभासदांचे पाल्याचासुद्धा मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच संस्थेच्या स्थापनेपासुन आतापर्यंत व्यवस्थापक म्हणुन सेवारत असणारे श्री.विनायक पिदुरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.अरविंद तिरणकर, संचालन श्री.विनोद बुच्चे व आभार प्रदर्शन श्री.प्रकाश देवाळकर यांनी केले.यशस्वितेसाठी संचा लक मंडळ व कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.










