कोरपना पोलीस ऑक्शन मोड वर उडान पुलावर हुल्लडबाजी केल्यास कारवाई

44

कोरपना पोलीस ऑक्शन मोड वर उडान पुलावर हुल्लडबाजी केल्यास कारवाई

नितेश केराम
कोरपना वनसडी व पारडी येथे नुकत्याच बांधलेल्या उड्डाण पुलावर तरुण मंडळीनी गोंधळ स्टँटबाजी बर्थडे पार्टी व हुल्लडबाजी करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे या पाश्रभूमीवर कोरपना पोलिसांनी कठोर भूमिका घेत मोहीम उभारण्याचे ठरविले आहे पोलिसांनी स्पष्ट केले की उडान पुलावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल यासोबत वाहतूक शिस्त भंग करणाऱ्यांवरही धडक कारवाई केली जाणार आहे यात प्रामुख्याने विना हेल्मेट दुचाकी चालवीने विना लायसन्स दुचाकी व चारचाकी चालवीने महामार्गांवर विरुद्ध दिशेने वाहन चाळविणे कर्णकर्षक हार्ण वापरणे फ्याँसी नंबर प्लेट लावणे कानठळ्या बसविणारे कर्णकर्षक हॉर्न वापरणे फटाका सायलेंसर बसवून ध्वनीप्रदूषण करने पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहने चाळविणे या सर्व प्रकारांवर विशेष मोहीम राबविली जाणार असून नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अपघात टाळण्यासाठी व सुक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे अन्यथा दंड आणि कारवाईला समोर जावे लागेल
विना हेल्मेट दुचाकी चालविण्यासह वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तीवर
धडक मोहीम आमच्या विभागातून सुरु केली आहे यावर वाहतुकीच्या सुक्षितेच्यादुष्ठने नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे व कायद्याने पालन करावे असे आवाहन कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे निरीक्षक यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here